शिक्षण आणि समाजसेवा

लेखन साहित्य
तस पाहिल, तर शिक्षण आणि समाजसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, समाजशिक्षणाची सुरुवातच लोकशिक्षणामधून होते. ”अवघेची हे जण, शहाणे करुन सोडावे” या उक्तीप्रमाणे समाजकार्य केले जाते, त्यामुळेच आद्यसमाजसुधारकांनी सुध्दा शिक्षणावरच भर दिला. आम्ही एम. एस. डब्ल्यू. चे विद्यार्थी समाजकार्यचे शिक्षण घेत असताना क्षेञकार्यासाठी विविधता गावामध्ये जातो. साहजिकच आमच्या समाजकार्यच्या अभ्यासाची सुरुवात गावात असणार्‍या अंगणवाडी व शाळेपासून होते. शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्राथमिक शाळेची ती इमारत येथे. जेथे आपण लहानपणी शिकलेलो असतो. शाळेत पोहचल्यावर मी ही जणू माझ्या बालपणात जातो. पण अलीकडे शाळेचे चित्र बदलले आहे.
      श्रीमंताची मुले सर्रास इंग्लिश मेडिअमच्या शाळेमध्ये शिकतात, तर गरिब शेतकर्‍याची, खेडुतांची, शेतमजुरांची मुले ही जिल्हा परिषद शाळात शिकणार्‍या शिक्षकांची मुलेसुध्दा इंग्लिश मेडिअमच्या शाळेमध्ये शिकतात. मंग जिल्हा परिषद शाळेत उरतात, ती तळागळातील सामान्य वर्गातील मुले. आता यांच्याकडे लक्ष कोण देईल. शिक्षक, पालक, नेते यापैकी कोणालाच जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या मुलांच्या भविष्याविषयी फारसा कळवळा वाटत नाही. शिक्षक पगारी नौकरदाराप्रमाणे कामचुकार बनला आहे काय अशी शंका येते. कारण त्यांच्या कामाप्रती असणारी कर्तृत्व भावना व उत्साह फारसा जानवताना दिसत नाही. शाळा भरायच्या आधी पाच मिनिटांमध्ये शिक्षक येतात, शाळा सुटायच्या पाच मिनिटे आधी निघून जातात.
      मी ज्या शाळेमध्ये पाहणीसाठी गेलो, त्या शाळेमधील विद्यार्थी कसा पाहिजे, व मी बालपणी कसा होतो, हे मनाला विचारू लागलो. मी शाळेमध्ये माझ्या शिक्षकांमुळे शिस्तप्रिय होतो. मी ज्या गावात शाळा पाहणी करत होतो. ती शाळा मी पडताळून पाहू लागलो, त्यावेळी शाळेतील बर्याच प्रमाणात विद्यार्थी बेशिस्त दिसू लागली. 70% विद्यार्थी शिस्तप्रिय असतील हे तेवढेच खरे. पंरतु म्हणतात ना ” ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुणगुणू लागला” या उक्तीप्रमाणे बाकी विद्यार्थी बिघडणार नाहीत, हे कशावरुन.
        शाळेची प्रार्थना सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी रांगेत लावायचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, पंरतु या शाळेत जेमतेम एक दोन शिक्षक सोडले तर बाकी शिक्षक पगारी नौकरदाराप्रमाणे समोर उभे राहिले होते. यामुळे प्रार्थना चालू असताना विद्यार्थ्यांची हालचाल, खोड्या करत होती, परिपाठ चालू असताना विद्यार्थ्यांचे लक्ष समोर नव्हते. माझ्या सारखा समाजकार्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी हे कसे पाहू शकेल?
        समाजामध्ये बदल घडवायचा असेल, तर ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व्हायला पाहिजेत यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे वाटते. पाश्चिमात्य इंग्लिश शाळाचा पगडा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाणवू लागला आहे. इंग्लिश शाळांना रोज वेगवेगळे गणवेश असतात, पंरतु ग्रामीण भागातील विद्यार्थी सात दिवस एकच गणवेश घालू शकत नाहीत ही मला शोकांतिका वाटते. महात्मा गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला त्यांच्या विचाराला अनुसरून आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण दिले पाहिले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे शेतकर्‍यांची, शेतमजुरांची मुले गुणवत्तापूर्ण बनली पाहिजेत.
– कृष्णा भारत सापते
9850378910
प्रथम वर्ष विद्यार्थी,
मानवलोक समाजकार्य विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *