वाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के

ब्रेकिंग न्यूज

◆ वाचाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल – शिवश्री रामकीसन मस्के

◆ आई-वडिल गुरुजन वर्ग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्या – प्रा.विजयकुमार गंगणे

—————————————

अंबाजोगाई :- सांडेश्वर माध्यमिक विद्यालय चनई ता.अंबाजोगाई या ठिकाणी माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती *वाचन दिन , घटस्थापना , नवरात्र उत्सव आणि फटाके मुक्त दिवाळी* अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात प्रमुख वक्ते शिवश्री रामकीसन मस्के यांनी वरील विचारा बरोबर वाचनाने मन -मनगट-मस्तक मजबुत होते आणि मजबुत मस्तक अनेकांना मजबुत करते हे झाले आणि आत्महत्या मुक्त शेतकरी , व्यसन मुक्त तरुण , दंगल मुक्त भारत या माध्यमातून आपल्या देश पातळीवर प्रचंड प्रमाणात प्रबोधन घडवून आणले आणि फटाके मुक्त दिवाळी , नवरात्र उत्सव , गणेश उत्सव यासारख्या अनेक उत्सवातून निखळ शिक्षण आणि मानवतेचे धडे दिले आणि कर्मकांडातून होणारी सामान्य माणसाची लूट थांबली तर आपला भारत देश महासत्ताक होईल अन डॉ अब्दुल कलाम यांचे हेच स्वप्न होते .

सर्वप्रथम राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक शाळेचे सहशिक्षक शिवश्री काकडे सर यांनी केले .

त्या नंतर शिवश्री प्रा.विजयकुमार गंगणे सर यांनी डॉ अब्दुल कलाम यांचे विचार सांगताना सातत्य व मेहनतीच्या बळावर आपण यशस्वी होऊ शकतो हा विश्वास विद्यार्थ्यांनी आपल्या मनात जागृत ठेवून आपल्या सकस बुद्धीचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी सद्सद्विवेक बुद्धीने विज्ञानवादी विचाराने प्रेरित होऊन प्रेरणा घ्यावी . विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात *”ज्ञानाचा ध्यास व गुणवत्तेचा अभ्यास”* करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे हा विचार मुलांसमोर व्यक्त केला . या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवश्री प्रा.विजयकुमार गंगणे तर प्रमुख वक्ते म्हणून शिवश्री रामकीसन मस्के सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे सहशिक्षक स्वामी सर , शिंदे सर सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना स्वामी सर म्हणाले मुलांनी आपल्या परस्थिती वर मात करून स्वतःचे भवितव्य घडवावे . सूत्रसंचालन चि. अशोक चोरमले , चि. महादेव शेप यांनी केले तर स्वागतगीत शाळेतील मुलींनी कु.पुनम गायकवाड , कु.कोमल सामसे व कु.पल्लवी कदम यांनी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली अन आभार प्रदर्शन शिवश्री काकडे सर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *