अकलूज येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन

ब्रेकिंग न्यूज

अकलूज, दि. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या पहिल्या शाखेचे आज अकलूज येथे सरपंच शिवतेजसिंह
मोहितेपाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांन्या न्याय देणारा पक्ष आहे. दिव्यांगांना समाजात वावरताना अनेक अडचणींना
सामोरे जावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांना समाजात मानाचे स्थान मिळेल. पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या अडचणी सरकार दरबारी योग्यपणे मांडू शकू असे यावेळी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय कुलकर्णी
यांनी सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष आदम तांबोळी, कार्याध्यक्ष जहांगिर तांबोळी, उपाध्यक्ष संदिपान चव्हाण, खजिनदार बबन
शिरढोणे, सरचिटणीस नागेश पलंगे, गणेश देवकर, रणजित कांबळे, उत्कर्ष शेटे, राजु माने, राजाराम जाधव,दत्तात्रय माने, पिंटु भोसले, नुतन माने, उत्तम भोसले, काका काळे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *