डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे

अंबाजोगाई
बोधीवृक्ष प्रतिष्ठाण व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार,शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला संविधानाच्या माध्यमातून आज संपुर्ण देश चालत असून संविधानाने भारतीय लोकशाही बळकट केली आहे. आरक्षणामुळे वंचित व तळागळातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात योगदान देता येत आहे.शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने सामाजिक अभिसरण होवून त्याचा सकारात्मक परिणाम देशात झाला.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे डोक्यावर घेण्यापेक्षा ते डोक्यात घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.त्याशिवाय देशातील सामाजिक विचारांची दरी कमी होणार नाही.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केले.त्या येथील बोधीवृक्ष प्रतिष्ठान व दिपीकाताई जाधव विचारमंचच्या वतीने मान्यवरांना पुरस्कार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमात शुक्रवार, दिनांक 27 एप्रिल रोजी बोलत होत्या.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शहरातील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात जाहीर व्याख्यान, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध क्षेञातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे (केज) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अांबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दाजीसाहेब लोमटे,ज्येष्ठ पत्रकार अ.र.पटेल,संपादक स.का.पाटेकर, अमीर पटेल,ज्ञानेश्वर वैद्य तसेच सत्कारमुर्ती महादेव लोखंडे,डॉ.संजय बनसोडे,प्रा.किर्तीराज लोणारे,नागेश औताडे,ऋचा जगन सरवदे,सय्यद अमजद यांची यावेळी विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते यावेळी नागेश औताडे (पञकारीता),महादेव लोखंडे (रंगकर्मी), डॉ.संजय बनसोडे (वैद्यकिय सेवा), कु.ऋचा उर्फ सावली जगन सरवदे (क्रिडा), प्रा.किर्तीराज लोणारे (शैक्षणिक),सय्यद अमजद (सामाजिक) यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. शहर व परिसरातील 127 हुन अधिक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले.या प्रसंगी डॉ.संजय बनसोडे, नागेश औताडे,महादेव लोखंडे व प्रा.किर्तीराज लोणारे यांनी सत्काराला उत्तर दिले.तर अध्यक्षीय समारोप करताना दाजीसाहेब लोमटे यांनी सदरील उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले. अंबाजोगाईत यापुढेही हा उपक्रम सातत्याने सुरू रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रमुख वक्ते मच्छिंद्र खाकरे (जिल्हाध्यक्ष,प्रोटान, बीड) यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलुंची मांडणी आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानातून केली. सद्य:स्थितीत शिक्षण व्यवस्था कोलमडून पडल्याचे सांगुन बहुजन समाजातील उपेक्षीत व वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दुर ठेवण्याचे काम विद्यमान सत्ताधारी करत असल्याचे ते म्हणाले.अशा काळात आरक्षणाच्या माध्यमातून जी माणसे मोठी झाली, विकसीत झाली त्यांनी आपली जबाबदारी ओळखून वंचित घटकांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मच्छिंद्र खाकरे यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मकरंद जोगदंड यांनी करून उपस्थितांचे आभार अरविंद साळवे यांनी मानले.तर प्रास्ताविक दयानंद कांबळे यांनी केले.यावेळी आयोजक
बोधीवृक्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दयानंद कांबळे,दिपीकाताई जाधव विचारमंचचे अध्यक्ष मोबीन देशमुख, सचिव अजय गोरे,उपाध्यक्ष अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल उघडे,आकाश कांबळे,अमर कांबळे, संतोष सोनवणे,पल्लवी मस्के,पुजा जोगदंड,वैशाली शिंदे,शुभम शिंदे, सुधीर जाधव,भारत क्षीरसागर, ऋषीकेश जोगदंड, प्रताप दासुद, अभिषेख जोगदंड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतसेाठी पुढाकार घेतला.यावेळी सभागृहात अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 thoughts on “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे वंचित लोकांचा विकास झाला -डॉ.अंजलीताई घाडगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *