पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

अंबाजोगाई

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथे विहीरीवर पोहायला गेलेल्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. परमेश्वर हनुमंत आगळे (१८) व ज्ञानेशवर महादेव आगळे (१८)असे मृत झालेल्या भावांची नावे आहेत. या दोघांनीही यंदा इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती. तर परमेश्वर याची ६ मे रोजी नेटची परीक्षा होती. पुर्णता: पोहायला येत नसतानाही आज या दोघांनी विहीरीत पोहण्याचे केलेले धाडस अंगलट आले आणि जीवाशी मुकावे लागले. परमेश्वरचे वडील हनुमंत आगळे हे घटनास्थळीच होते. त्यांनी मुलांच्या ओरडण्याचा आवाज येताच विहीरीत उडी घेतली त्या दोघांनाही बाहेर काढले. घटनेची  माहिती  मिळताच सरपंच श्रीनिवास आगळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोघांनाही उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात हलिवले. परंतु त्या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी  घटनेने अकोला गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *