अन्नदान-रक्तदाना बरोबर ‘श्रमाचे ही दान’ करु – संजय फड

अंबाजोगाई

अन्नदान-रक्तदानाने जीवदान मिळते हे खरे आहे. परंतु जीवनात अन्नदान-रक्तदान  जितके महत्त्वाचे आहे , अगदी-अगदी तितकेच महत्त्वाचे पाणी तर मग खरच-खरच मनापासुन प्रथमतः गाव हळुहळू  महाराष्ट्र आपणास  पाणीदार-दाणेदार-बाणेदार बनवायचे असेल तर वैयक्तिक ऐक पै न दान करता , खर्च न करता फक्त श्रमाचे दान म्हणजे केवळ आणि केवळ  श्रमदान केले तर हा अपेक्षित बदल सुनिश्चित होईल. तेंव्हा मोठ्या प्रमाणात सारेच तरुण मंडळ एकजुटीने, ऐकाविचाराने या श्रमदानाचे चळवळीत सामील व्हावे असे अवाहन संजय फड यांनी केले आहे. तर मग चला आधुनिक काळात आणि भविष्यात अन्न आणि रक्त मुबलक प्रमाणात असेल-राहिल याबाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. परंतु पाणी ही समस्या अतिशय गंभीर रूप धारण करण्याचे संकेत अलीकडच्या वारंवारच्या पाणीटंचाई व अधुन-मधुन च्या दुष्काळाच्या सावटावरून दिसुन येत आहे. तेंव्हा ही अतिशय चिंताग्रस्त बाब आहे. तेंव्हा काळाची पावले ओळखता गावा-गावातील आपसी मतभेद-हेवेदावे-मत्सर-द्वेष-राजकारण यासह जात-पात-धर्म सार सारकाही बाजुला ठेऊन सर्वच गावांमधे गावक-यांनी विशेषतः तरुणांनी अतिउत्साही मनाने मोठ्या प्रमाणात अतिशय महत्वपुर्ण असलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी एकञित येऊन ही श्रमदानाची चळवळ यशस्वीरित्या पार पाडावी. जेणे करुन भविष्यातील अडचण निर्माण होण्यास वावच मिळणार नाही. आणि हो यात मी नौकरदार-अधिकारी आहे म्हणुन कुणी मागे न राहता , अशा मंडळींनी तर श्रमदाना सोबत कामसाठी जमेल त्या परीने आर्थिकदान देण्याचे विनंतीमय अवाहन ही स्वतः शिक्षक असणाऱ्या वरवटी येथील संजय फड यांनी केले आहे……!! तेंव्हा १ मे या महाराष्ट्र दिनी ईतर काहीही काम न करता ईतक्या मोठ्या प्रमाणात श्रमदान कार्यात सहभागी व्हा की, हे महाश्रमदान केवळ महाराष्ट्रानेच नाही तर संबंध देशाने पाहावे आणि ही राज्यव्यापी चळवळ अल्पावधीतच देशव्यापी व्हावी. तर मग बघताय काय सामील व्हा……! अशी आर्थहाक संजय फड यांनी सर्वांसाठीच दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *