वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा जागर

अंबाजोगाई
तालुक्यातील मौजे वरवटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वरवटी येथे प्रबोधनाचा जागर करण्यात आला.
जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले,प्रमुख वक्ते म्हणून अॅड.विलास लोखंडे हे तर विशेष अतिथी म्हणून प्रा.अजय चौधरी, अॅड.गोरे, अॅड.माणिक आदमाने, धिमंत राष्ट्रपाल(बेटी बचाव अभियान), अशोक पालके (युवा आंदोलन), मारूती माने, प्रविण मस्के(नाडर विचारमंच),गंगाधर चाटे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत क्षिरसागर आदींची विचारमंचावर उपस्थिती होती.प्रारंभी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचे हस्ते पंचशिल ध्वजारोहण व महामानवाला अभिवादन करण्यात आले.जयंती उत्सव समितीचे संयोजक भारत क्षिरसागर यांनी प्रास्ताविक तर अच्युत क्षिरसागर यांनी सुञसंचालन केले.उपस्थितांचे आभार विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले.या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सोमवंशी,कातळे मॅडम,मथुराबाई क्षिरसागर,कोंडीबा दुपते अंगद दुपते,लक्ष्मण दादा,गोविंद उघडे आदींसहीत वरवटी येथील ग्रामस्थ,महिला,युवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेबांचे विचार जगाला दिशा देणारे-डॉ.राजेश इंगोले
बाबासाहेबांचे कार्य हे सर्वव्यापी आहे.त्यांचे विचार हे परीवर्तनाला गतिमान करणारे व जगाला दिशा देणारे आहेत.ते आत्मसात करा. त्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.
गाव तिथे बुध्दविहार झाले पाहिजे
-प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे
एकञ येवून समाजाचे काम करा,हे कार्य करत असताना तसूभरही बाबासाहेबांचा विसर पडू देवू नका. गावागावात बुध्दविहार बांधले पाहिजे. याकरीता आता समाजाने पुढाकार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *