युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत -मा. निश्चयमात्रे

अंबाजोगाई

 युवकांनी देश घडविणा-यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. ज्यांनी देश घडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार आजच्या युवापिढीने समजून घेतले पाहिजेत असेप्रतिपादन लोकायत सामाजिक संस्था,पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते निश्चयमात्रे यांनी केले.येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय तसेच योगेश्वरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) व राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने दि.०१ मे ०८ मे या कालावधीत युवकभान शिबिराच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून निश्चयमात्रे बोलत होते. आपला देश निर्माण करणा-या माणसांच्या पाऊलखुणांवर ही शिक्षण संस्था वाटचाल करीत आहे. या महामानवांच्या पद्चीन्हांवर संस्था चालली आहे, याचा मला आंनद वाटतो असे मत निश्चयमात्रे यांनी  व्यक्त केले.

गोविंद पानसरे यांनी छ.शिवाजी महाराजांवर अतिशय चांगले पुस्तक लिहिले, पण दुर्देवाने त्यांचे विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. हे युवकांनी समजून घेतले पाहिजे. आपण महामानवांचे विचार समजून घ्यावेत, ज्यांनी भारतीय संविधान निर्माण करायला आपले सर्वस्व दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण केले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरुष समानता या प्रश्नांची उकल करण्यासाठी युवकांनी कार्य केले पाहिजे. स्त्रियांना समाजात सन्मान, सुरक्षितता न्यायहक्क मिळाले पाहिजेत असे मत निश्चयमात्रे यांनी व्यक्त केले.

या युवकभान शिबिरासाठी पुणे येथील लोकायत सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या कल्याणी दुर्गा रविंद्रप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात प्रागतिक विचारांना आपण महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादित केले. युवकांनी स्त्री सन्मानाला महत्व दिले पाहिजे. युवकांचा दृष्टीकोण निकोप असला पाहिजे, असे  विचार त्यांनी व्यक्त केले. मी जात मानत नाही म्हणून मी माझे आडनाव देखील लावत नाही. आपल्या नावात आपल्या आईलाही स्थान असावे म्हणून मी स्वतःला कल्याणी दुर्गा रविंद्र म्हणून घेते.युवकांनी हे समजून घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी कार्य केले पाहिजे. या योगेश्वरी शिक्षण संस्थेला महान परंपरा आहे. भाऊसाहेब चौसाळकर व त्यांच्या सहका-यांनी समाजाच्या भल्यासाठी; सर्व सामान्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. आपली नौकरी, कामधंदा करून देखील समाजासाठी काही करता येते हे युवकांनी समजून घेतले पाहिजे. शिक्षण, नौकरी शिक्षणासाठीची लागणारी भरमसाठ फी हे प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत. केवळ चांगले गुण मिळविण्यासाठी शिक्षण नव्हे तर मुलांना घडविण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्था कार्य करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत कल्याणी दुर्गा रविंद्र यांनी व्यक्त केले.याप्रसंगी साने गुरुजीचे खरातो एकची धर्म हे गीत निश्चयमात्रे व कल्याणी दुर्गा रविंद्र यांनी सादर केले व युवकांना प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाचा  अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केला.

एक जबाबदार नागरिक घडला पाहिजे, महाविद्यालयात येणारा तरुण संस्कारीत झाला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. युवकांनी गांभीर्याने या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केले.  मनुष्य घडविण्याच्या अभ्यासक्रम कोणत्याहीमहाविद्यालयात शिकविला जात नाही, तो आम्ही येथे घेत आहोत. युवकांनी गांभीर्याने या गोष्टी समजून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा.रमेश सोनवळकर यांनी केले. त्यांनी दि.०१ मे ०८ मे या काळात होणा-या वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती दिली. एन.एस.एस. व एन.सी.सी.च्या युवकांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या शैलीमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.धनाजी आर्य यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.किरण चक्रे यांनी केले.

या कार्यक्रमासाठीयोगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अड.शिवाजीराव कराड, सचिव अड.उद्यकुमार कामखेडकर, सहसचिव उद्यकुमार आसरडोहकर, प्रा.एन.के.गोळेगावकर, डॉ.मेजर शांतीनाथ बनसोडे, प्रा.माणिकराव लोमटे, युवकभान शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक श्री.गणपत व्यास (गुरुजी), राष्ट्रीय छात्रसेना व युवकभान शिबीराचे प्रमुख प्रा.मेजर एस.पी.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले, पदव्युत्तर संचालिकाडॉ.शैलजा बरुरे तसेच जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतराम कराड, महाविद्यालयातील प्राध्यापक, एन.एस.एस. व एन.सी.सी. कार्यक्रम अधिकारी, कर्मचारी व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *