धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले !

अंबाजोगाई

धनादेशाच्या रकमेत जास्त आलेले ₹ १०,००० परत केले !

अंबाजोगाई, आज दि.९ मे रोजी B.O. I. बँकेमध्ये श्री.रवी देशमुख हे आपल्या जवऴ असलेला पंधरा हजारांचा ( ₹ १५,००० ) धनादेश वठवण्याकरिता गेले असता, बँकेचे कँशियर श्री.पवार यांनी त्यांना गडबडीमध्ये पंधरा हजारां ऐवजी पंचवीस हजार रूपये
( ₹ २५,००० ) दिले. काही वेऴानंतर श्री.देशमुख यांना ही बाब लक्षात आली त्यांनी तात्काऴ बँकेकडे धाव घेत त्यांना जास्तीचे मिऴालेले दहा हजार रूपये ( ₹ १०,००० ) बँकेमध्ये श्री.पवार या कर्मचार्‍याकडे सुपूर्त केले. बँक कर्मचार्‍यांनी तथा BOI शाखेच्या मँनेजर साहेबांनी यावेऴी श्री.रवी देशमुख यांचे आभार मानले. आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतूकही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *