फेसबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय …

अंबाजोगाई

चमकोगिरी करुन जनतेचा विश्वास कमावता येत नाही – भाई शंकर चव्हाण

परळी व केज मतदार संघात आता फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंची संख्या वाढली असून ही मंडळी सोशल मिडीयावर चमकोगिरी करत असल्यामुळे त्यांना आमदार होण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे आत्तापासूनच काही सोशल मिडीयातले फे सबुक, व्हॉट्‌सऍप हिरोंना शेतकरी कामगार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष (तालुका चिटणीस) भाई शंकर चव्हाण यांनी चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारची चमकोगिरी करुन आमदार किंवा खासदार होता येत नसतं. त्यासाठी जनतेचा विश्वास कमवावा लागतो, जनतेच्या मनात आपुलकीचं घर करावं लागतं, जनतेला विश्वास मिळवून द्यावा लागतो की, मी स्वत: समाजहितासाठी, जनकल्यानासाठी प्रतिनिधीत्व करु शकतो. अलीकडील काळात तर या दोन्ही मतदार संघातील अनेक तरुण मंडळींमध्ये एक वेगळयाच प्रकारची क्रेझ निर्माण झाल्याची पहावयास मिळत आहे. स्वत:च्या वाढदिवसांवर लाखो रुपये खर्च करुन चौकाचौकात बॅनरबाजी, सोशल मिडीयावर प्रसिध्दीसाठी वेगवेगळया पोस्ट करुन स्वत:चीच …. दाखवण्यात जास्त रस आणत आहेेत. अशा चमकोगिरी करुन पैशांचा अपव्यय करुन शक्ती प्रदर्शन करण्यात गुंग असल्यामुळे अशा प्रकारचे चमकोबहाद्दर जनतेची काय कामं करणार यात शंका निर्माण होत आहे. महापुरषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याच्या नावाखाली रोज मिरवणुका काढून डॉल्बी, ताशा, वेगवेगळे वाद्य वाजवून नाचण्याचा कार्यक्रम अगदी जल्लोशात चालू आहे. पण महापुरूषांची जयंती ही नाचून नाही तर वाचून करायला हवी असंही भाई शंकर चव्हाण म्हणाले. ज्या महापुरूषांची आपण जयंती साजरी करतो त्यांच्या इतिहासाची पाने या भापकेबाज आमदारकीची स्वप्नं पाहणारांनी कधीच चाळली नसतील हे मात्र सत्य आहे. एकीकडे पाणी      फाउंडेशन महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे, प्रत्येक लहानापासून वृध्दांपर्यंत श्रमदान करत आहे, अशा प्रकारच्या समाजसेवेत हा पैसा कामी आला तर बरं होईल. तीच खरी समाजसेवा असेही भाई शंकर चव्हाण बोलतांना म्हणाले. चमकोगिरी करुन स्वत:च्या नावापुढे भावी आमदार वगैरे लावून आत्तापासूनच आपण जनतेचा व स्वत:चा विश्वासघात करत असल्यामुळे अशा चमकोगिरी करणारांना वेळीच आवर घातला तर भाविष्यात अशा प्रकारचे चाळे हे लोक करणार नाहीत व पैशांचा अपव्यय सुध्दा टळेल व चांगल्या कामासाठी हा पैसा उपयोगात आणता येईल. व आमदारकीची स्वप्नं पडणार नाहीत. जेणेकरुन हयाच युवकांपासून समाजसेवा घडेल हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *