अंबाजोगाईतील पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर नव्याने बांधून दया – युवासेना

अंबाजोगाई

पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर बांधून दया व कर्मचारी वाढवा युवासेनेचे अप्पर पोलीस अधिक्षकांना निवेदन

अंबाजोगाई | प्रतिनिधी :

येथील अंबाजोगाई पोलीस कर्मचाऱ्यांना आता राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टरची इतकी दुरावस्था झाली आहे की, झोपडपट्टया तरी बऱ्या वाटू लागल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कमतरता असल्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. याचा विचार अंबाजोगाई येथील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला या हक्काच्या व गंभीर विषयाची युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दखल घेतली व अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे क्वार्टर तात्काळ नव्याने बांधून दयावे व अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढवावे असे युवासेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रसंगी दिलेल्या निवेदनावर युवासेना  तालुकाप्रमुख विष्णू धायगुडे, दिनेश उपरे, शिवसेना उपशहरप्रमुख अर्जुन जाधव, महिला आघाडीच्या उषाताई यादव, अभिमन्यू वैष्णव, प्रशांत शिंदे, आदित्य लोखंडे, ॲड विशाल घोबाळे, प्रविण शिंदे, शाम धायगुडे आदी युवासैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत व त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *