शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी गजानन मुडेगावकर

अंबाजोगाई
अंबाजोगाई (प्रतिनिधी )- बीड जिल्हा शिवसेनेच्या नविन पदाधिकारी जाहिर करण्यात आली असुन अंबाजोगाई शहरप्रमुखपदी येथील पत्रकार व धडाडीचे कार्यकर्ते गजानन मुडेगावकर यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 नविन निवडीत तालुकाप्रमुख पदी अर्जुन वाघमारे, केज अंबाजोगाई मतदारसंघ संघटक पदी प्रशांत आदनाक, जिल्हा सह संघटक अशोक गाडवे,तालुकासमन्वयक बाळासाहेब शेप,जिल्हा सह संघटक संतोष काळे नियुक्ती झाल्याचे शिवसेना मुखपत्रातुन जाहीर करण्यात आले असुन निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी बोलताना गजानन मुडेगावकर यांनी शहरप्रमुखपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे, संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे,संपर्क प्रमुख सुधिर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,केज मतदार संपर्क प्रमुख अनिल विचारे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब अंबुरे आदीसह शिवसेना नेते व शिवसैनिकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *