सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

बीड

महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वतंत्र्य सेनानी , नागरिकांच्या भेटी घेतल्या व महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. पीक विमा योजनेत बीड जिल्हयाचा देशात प्रथम क्रमांक आल्याबद्दल जिल्हयातील जिल्हाधिकारी, अधिकारी कर्मचारी,प्रतिनिधी यांनी सहकार्य केल्यामुळे आपण हा बहुमान मिळवू शकलो, असे सांगून या सर्वाना शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री मुंडे यांनी उघड्या जीपमधून पोलीस दलाच्या विविध पथकांचे निरीक्षण केले. पोलीस दल, गृहरक्षक दल, आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या पथकांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, समाज कल्याण सभापती संतोष हंगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी.एम कांबळे, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उप अधिक्षक वैभव कलबुर्मे,उपविभागीय अधिकारी,विकास माने, तहसीलदार श्री.सेंगटे आदि मान्यवर पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसेनानी, मान्यवर नागरिक आणि अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *