व्हरकटवाडीत विविध सामाजिक संस्थांचे महाश्रमदान

माजलगाव

1 मे कामगार दिनानिमित्त वाॅटर कप स्पर्धेतील श्रमदान स्थळावर जत्रेचे स्वरुप

महाश्रमदानाचे औचित्य साधत एव्हाना दिवाळीला माहेरचे तोंड बघणार्या लेकी व जावई व्हरकटवाडीत उपस्थित झाल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. लेक जावई कामावर तर लेकरबाळ सांभाळण्यात वयोवृध्द आजी आजोबा मग्न झाल्याचे पहायला मिळाले.

दिंद्रुड | संतोष स्वामी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पाणी फाऊंडेशन ने काल दि 1 रोजी महाश्रमदानाचे अवाहन ग्रामिण तथा शहरी भागातील जनतेला केले होते. या अनुषंघाने धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी या वाॅटरकप स्पर्धेत सहभागी गावात धारुर व माजलगांव तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत महाश्रमदानात सहभाग घेतला. सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा हि दिड महिण्याच्या कालावधीत संपन्न होणारी जलसिंचनाबाबत उत्कृष्ठ अशी स्पर्धा असुन या स्पर्धे मुळे दुष्काळग्रस्त डोंगर पट्याचे सुकाळात रुपांतर होणार आहे.पाणी फाऊंडेशन च्या उपक्रमाला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे.आय टि आय काॅलेज बीड, संकल्प मिल्ट्री फाउंडेशन स्कुल,संगम,मोहनदादा जगताप मित्र मंडळ,लोकप्रिय बहुउद्देशीय सामाजिक संस्था,नित्रुड, जय श्रिराम सामाजिक संस्था,दिंद्रुड जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा,मोहखेड केंद्र अंतर्गत सर्व शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी,व्हरकटवाडी चे जवळपास सर्व जावई व नातेवाईकांनी 1 मे रोजी श्रमदान करत व्हरकटवाडी ला या स्पर्धेत जिंकण्याकडे बळकटी दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बीड चे चाळीस विद्यार्थी व 10 विद्यार्थीनींनी सलग पाच दिवस श्रमदान करत 23 एल बी एस तयार केली आहेत.त्यांच्या या श्रमदानाचा व्हरकटवाडी ग्रामस्थांना मोठा हातभार मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.संकल्प मिल्ट्री फाऊंडेशन स्कूल संगम च्या संदिप तिडके व सिध्देश्वर जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली 110 तरुणांनी डोंगरदर्यात भारत माताकी जय म्हणत श्रमदान केले तसेच हे सर्व बघत शिकवणी देणार्या शिक्षकांना श्रमदान करतांना पाहुन व्हरकटवाडी ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. दिंद्रुड येथिल सामाजिक कार्यकर्ते संतोष स्वामी, अतुल चव्हाण,अमोल ठोंबरे,अंकुश साळुंके,नितीन वाघमोडे, अनिल कटारे,गावंदरा येथिल शिक्षक हनुमान बडे,नित्रुड चे सुर्यकांत बडे,शामसुंदर बीडकर,गणेश बडे यांनी श्रमदानात सहभागी होत व्हरकटवाडी ग्रामस्थांचे मनोबल वाढवले.सरपंचपती राम व्हरकटे यांनी श्रमिकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *