रंगोन्मेष 2018 ने परळीकरांना दिली अभिनव नाट्यपर्वणी!

परळी

मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उत्साहात समारोप

परळीत प्रथमच सांस्कृतीक चळवळीच्या वाढीसाठी प्रेरक ठरलेल्या रंगोन्मेष 2018 या नाट्य महोत्सवाने  परळीकरांना अभिनव नाट्य पर्वणीची अनुभूती दिली. दोन दिवस चाललेल्या या नाट्य महोत्सवाचा  उत्साहात समारोप झाला. दोन दिवसात अत्यंत दर्जेदार व नाट्यप्रेमींना खिळवून ठेवणार्‍या नाटय कलाकृती सादर झाल्या. यामुळे परळीतील सांस्कृतीक चळवळीला एकप्रकारे उभारी देण्याचा हा उपक्रम ठरला.   अ.भा.नाट्य परिषद, अपुर्व मनोरंजन व नाट्यकलावंत संघटना यांच्या पुढाकारातून व संयोजनाने  लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीरात रंगोन्मेष 2018 नाट्यमहोत्सव घेण्यात आला. दि.26 रोजी या नाट्य महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा नाटयपरिषद परळी शाखेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष अय्युब पठाण, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, नाटककार रानबा गायकवाड, महिला व बालहक्क आयोगाच्या सदस्या डॉ.शालिनीताई कराड, महर्षी कणाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भांगे गुरूजी, डॉ.बालासाहेब कराड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यसंयोजक अपुर्व मनोरंजन व सिनेनाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष रंगकर्मी प्रदिप भोकरे, सचिव प्रा.सिध्दार्थ तायडे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करून नाट्य वाटचालीबाबत सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी कांबळे यांनी केले. कार्यक्रमास रसीक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.   दोन दिवस सादर झालेल्या नाटकांमध्ये प्रदिप भोकरे दिग्दर्शीत गांधी कधी येणार , आकांत, काय झालं बाळ रडत होतं आणि लाल मुग्यां चावत नसतात या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक कलावंत रवी आघाव, पुजा कुरूंद यांनी आपल्या अभिनयाने रसीकांची दाद मिळवली. तर सिध्दार्थ तायडे, कल्याण वाघमारे, दयानंद सरपाळे यांचे तंत्रसाहाय्य, माधुरी दिक्षीत-महामुनी, श्रीकांत कानेगावकर यांचे अभिनय व माणिक गडदे यांचे नेपथ्य, विद्याधर सिरसाट यांचे संगीत यामुळे हा महोत्सव रंगतदार ठरला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विलास आरगडे, भरत घुगे, किरण आटोळकर, योगेश पारवे, वैजनाथ चौधरी, अभिषेक खोसे, शैलेश पवार, रोहित पारसे, विनायक नाईकवाडे, गणेश फड, गणेश गित्ते, सुकेश वायचळे, शस्त्रुग्न भांगे, गजानन हांगे, लक्ष्मण भिसे, राजाभाऊ मुंडे आदीसह अ.भा.नाट्यपरिषद, अपुर्व मनोरंजन व सिनेनाट्य कलावंत संघटना यांच्या पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *