15ऑगस्ट लघुपट कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित.

परळी

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या  कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये 15 ऑगस्ट लघुपट दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या. लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रा. अनिलकुमार साळवे तर प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय व सह दिग्दर्शन केले आहे. १५पंधरा ऑगस्ट लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटासह, पटकथालेखक- दिग्दर्शक प्रा.अनिलकुमार साळवे यांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- शिवकांता सुतार यांना मिळाला आहे. या लघुपटास लॉस अँजेलिस,California येथील जागतिक चित्रपट महोत्सव तसेच अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय लघुपट महोत्सवात सन्मान प्राप्त झाले आहेत. “15 ऑगस्ट”या लघुचित्रपटाला कोल्हापूर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये यश संपादन केल्याबद्दल प्रा. अनिलकुमार साळवे ,प्रा. सिद्धार्थ तायडे,शिवकांता सुतार आणि टीम 15 ऑगस्ट चे अभिनंदन मा. आमदार शिवाजीराव चोथे, प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी,म. शि. प्र. मं.चे मा.सतीशभाऊ चव्हाण, साहित्यिक आबासाहेब वाघमारे,ज्येष्ठ रंगकर्मी केशवराव देशपांडे, प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर,डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. राजू सोनवणे,पटकथाकार रानबा गायकवाड,साहित्यिक डॉ. संजय जाधव, प्रा. गौतम गायकवाड,कवी-नाटककार डॉ. विलासराज भद्रे, रंगकर्मी,प्रदिप भोकरे, कवी बालाजी कांबळे,बालासाहेब इंगळे,डॉ. संतोष रणखांब ,संपादक शंकर चव्हाण,रविंद्र जोशी,आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *