भुजंगराव गित्ते यांचे दुःखद निधन

परळी
तालुक्यातील बेलंबा येथील भुजंगराव निवृत्ती गित्ते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
परळी येथील योगीता ऑफसेटचे संचालक दिगांबर गित्ते यांचे ते वडिल होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात हिरीरिने भाग घेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवार 5 मे रोजी राख सावडण्याचा कार्यक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *