मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनंतराव चाटे राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित

मुंबई
राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे पुरस्काराचे वितरण
 अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अनंतराव चाटे यांची औरंगाबाद विभागातून डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ‘ग्रंथमित्र’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे करण्यात आले.ग्रंथमित्र पुरस्कार जाहिर मिळाल्याबद्दल अनंतराव चाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातील वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे,त्यांचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना आणि ग्रंथालय चळवळीत योगदान देणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. राज्यशासनाकडून 2014-15 या वर्षीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले होते. यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अनंतराव माणिकराव चाटे यांची डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कारासाठी औरंगाबाद विभागातून निवड करण्यात आली होती.हा पुरस्कार त्यांना 3 मे गुरूवार रोजी मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप रक्कम 15 हजार रोख,शाल-श्रीफळ आणि सन्मानपत्र असे आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते अनंतराव चाटे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
अनंतराव माणिकराव चाटे हे अंबाजोगाई व परळी तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. ग्रामिण भागात शिक्षण पोहोंचले पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून ते काम करीत आहेत. मराठवाडा ग्रंथालय संघ व बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह आहेत. 1988 पासुन ते ग्रंथालय चळवळीशी निगडीत आहेत.यापुर्वी अनंतराव चाटे यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई,वरवटी येथे तीन जिल्हास्तरीय व एक विभागीय पातळीवरचे ग्रंथालय आधिवेशन घेण्यात आलेले आहे.लोकनेते स्व.यशवंतराव चव्हाण व माजी आ.कै.रघुनाथराव मुंडे यांच्या कार्याची प्रेरणा घेवून अंबाजोगाई तालुक्यातील परळी -अंबाजोगाई राज्य रस्त्यावरील वरवटी या गावात अनंतराव चाटे यांनी ग्रंथालय व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनिय सामाजिक कार्य केले आहे.शैक्षणिक कार्यासोबतच दारूबंदी,हुंडाबंदी, शेती,सहकार,संस्कृती संवर्धन, स्वयंसहाय्यता बचत गट आदी उपक्रम ते रघुनाथ ग्रामविकास मंडळामार्फत राबवितात.यापुर्वी त्यांना राज्यस्तरीय पातळीवरील पद्मश्री मणीभाई देसाई प्रतिष्ठान,उरूळी कांचन, पुणे येथील राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार, लिलादेवी सिताराम अग्रवाल,सिल्लोड जि.औरंगाबादचा ग्रंथमिञ,वसंतराव नाईक युवा मंडळाचा वसंतभूषण पुरस्कार,कार्यकर्ता पुरस्कार,गुरूदास सार्वजनिक ग्रंथालयाचा उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार तसेच धावडी येथील मुकुंदराज सेवाभावी संस्थेच्या व परळी येथील छत्रपती शिवाजी महराज सेवाभवी संस्थेच्या वतीने सन्मानीत करण्यात आलेले आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर,जिल्हा ग्रंथालय अधिकारी दिपक काळे, ग्रंथालय निरिक्षक नागनाथ केसाळे आदींसहीत मान्यवरांची उपस्थिती होती.अनंतराव चाटे यांना सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल एस.बी.सय्यद,डॉ.डी.एच.थोरात, शिवाजी खोगरे,जनार्धन मुंडे,राज्य ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रा.रामेश्वर पवार,माजी अध्यक्ष अनिल बोरगावकर,जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सानप,संस्थेचे अध्यक्ष डी.आर.मुंडे, मुख्याध्यापक शिवाजीराव चाटे,सुग्रीव नेहरकर, एल.आर.मुंडे,श्रीहरी कांदे,हरिनारायण गर्जे,मनोज मुंडे,ज्ञानोबा चाटे,श्री कदम,श्री.आपेट आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *